बाजार सावंगी येथे अनम बहुउद्देशीय संस्था तर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य व व्यवसायिक शिबीर

अनम बहुउद्देशीय

खुलताबाद (प्रतिनिधी मुनीर शहा) । दिनांक २६ डिसेंबर २०२५ शुक्रवार सकाळी १० वाजता खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे अनम बहुउद्देशीय संस्था तर्फे महिलांन साठी मोफत आरोग्य व व्यवसायिक शिबीर बाजार सावंगी येथील रेणुका माता मंदिर परिसर ठेवण्यात आले होते

या शिबिरामध्ये संभाजीनगर येथील M.D In एक्यूप्रेशर थेरपिस्ट आरती पी सोनवणे सामाजिक कार्यकर्ती आणि दिनेश खोडके, आरोग्य जाणीव जागृती , सामाजिक कार्यकर्ता यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन होते तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या काही मशनरी द्वारे महिलांना व पुरुषांना शिबिराच्या ठिकाणी एक्यूप्रेशर थेरेपी करून दाखवण्यात आली व आरोग्य विषयी काही आयुर्वेदिक औषधींचे फायदेही सांगण्यात आले अनम बहुउद्देशीय संस्थाच्या संस्थापक अध्यक्ष समीर मुनीर शाह यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तरी या कार्यक्रमाला उपस्थित बाजार सावंगी गावचे सरपंच आप्पाराव पा. नलावडे ,उपसरपंच कारभारी पा. नलावडे , भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर पा. नलावडे , बाजार सावंगी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमण किशोर पा. नलावडे, बाजार सावंगी पोलीस चौकीचे जमादार श्री. कोल्हे, शिवसेना तालुका प्रमखु युवराज पा. नलावडे , माजी उपसभापती प्रभाकरराव शिंदे, माजी सरपंच वसंतराव पा. नलावडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश आबा नलावडे, ग्रामविकास अधिकारी आसाराम बनसोड, शिवसेना उपतालुकाप्रमुख अविराज निकम, बाजार सावंगी पोलीस पाटील कारभारी नरवडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजुम निलोफर मॅडम, स्वामी विवेकानंद स्कुल मुख्यध्यापीका कल्पना साळुंके, अंगणवाडी सेविका बाजार सावंगी बीट सुपरवायझर द्रोपती रोकडे, देशोन्नती वार्ताहर चांदखॉ पठाण, लोकमत वार्ताहर सय्यद लाल टेलर, सकाळ वार्ताहर श्रीधर पाटील, सामना वार्ताहर सचिन गवळी, दै. दिव्य मराठी वार्ताहर नामदेव नलावडे, मराठवाडा साथी वार्ताहर विनोद पा. नलावडे, आनंदभाऊ काटकर, आदिल शब्बीर शेख, पोपट काटकर, अरुण गायकवाड, अनम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर मुनीर शाह व पदाधिकारी रईस शाह, नदीम शेख, राजु शाह, नईम सय्यद, मुनीर शाह, जफर शाह, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, सीआरपी, मदत निसा, बचत गट महिला, गावातील इतर महिला व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here