नशिराबादच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील विराजमान; वटवृक्ष रोपण करून स्वीकारला पदभार

नशिराबाद

जळगाव (तालुका क्राइम प्रतिनिधी मनोज नाले) । नशिराबाद नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी आज एका मंगलमय आणि पर्यावरणपूरक वातावरणात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. सत्तेच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी त्यांनी कार्यालय परिसरात वटवृक्षाचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. या सोहळ्याला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा . गुलाबराव जी पाटिल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

पदग्रहण सोहळ्या प्रसंगी बोलता असताना ​नगरसेवकांनी ‘कंत्राटदार’ न होता ‘सेवक’ बनावे: पालकमंत्री
​पदभार स्वीकारण्याच्या या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मोलाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले की, “नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी जोमाने काम करावे. नगरसेवकांनी स्वतः ‘कॉन्ट्रॅक्टर’ (कंत्राटदार) बनू नये, तर विकासकामांवर लक्ष ठेवणारे सजग लोकप्रतिनिधी बनावे.” ​विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही.
​शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, “नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून निधीचा ओघ सतत सुरू राहील. विकासकामांच्या फाईल्स अडकणार नाहीत आणि निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची ग्वाही मी देतो.”
​यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नशिराबादमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश पाटील यांच्या निवडीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here