जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । येथील साहित्यभारती , संस्कारभारती आणि सारस्वत समाज यांचे वतीने दिनांक २९ डिसेंबर२०२५ रोजी सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता प्रा.पुनीत शर्मा यांचे त्यांच्याच ” फ्रॉम डाऊट टू धर्म” या पुस्तकाच्या अनुषंगाने “धर्म आणि संभ्रम ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
त्यांचे ” फ्रॉम डाऊट टू धर्म ” या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच भारतासहीत ब्रिटन,कॅनडा,,जर्मनी,ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांमध्ये एकाच वेळी प्रकाशन झाले.या पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिली असून आपल्या याच पुस्तकाच्या अनुषंगाने वक्ते आपल्या व्याख्यानात”धर्म आणि संभ्रम ” विषयाशी तत्त्वज्ञानाची सांगड घालून प्रकाश टाकतील.सारस्वत समाज ,जळगावच्या वतीने लेखक वक्त्याचा सन्मान करण्यात येईल.तरी सर्व रसिक,श्रोत्यांनी या कार्यक्रमास ,१६७,नवीपेठ,शरद सायकल ,आदिती साडियां शेजारी, एसएस मोबाईलचे वर पहिला मजला येथे उपस्थितीचे आवाहन केले आहे.







