सातारा (उपसंपादक अरुण मोरे) । आगामी सण, उत्सव, वर्षअखेर असलेने सातारा शहर परिसरात प्रभावी गस्त करणेबाबत पोलीस अधिक्षक सातारा तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक सातारा डॉ वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग, सातारा राजीव नवले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार गुरुवार (दि २५) वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण विभाग पोलीस ठाणे हददीमध्ये गस्त करित असताना एम. आय. डी. सी परिसर, सातारा येथे काही इसम चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी येणार असलेची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. मिळाले माहितीप्रमाणे डि.बी. पथकाने धनगरवाडी ते बिरोबा मंदिर रोडला सापळा लावला होता. रात्रौ ०८:०० वाचे सुमारास एक विनाक्रमांकाचे वाहन संशयीतरित्या फिरत असलेचे दिसुन आलेने सदर वाहनचालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला असता चारचाकी वाहनचालकाने त्याचे ताब्यातील वाहन आणखी वेगाने पळवु लागला. डि.बी. स्टाफने तात्काळ सदर वाहनाचा पाठलाग करुन ती गाडी थांबवीली.
त्यावेळी अंधाराचा फायदा घेवुन चालक गाडी सोडुन कॅनॉलचे बाजुने उसाचे शेतात पळुन गेला. तदनंतर पळुन गेलेल्या इसमाचा डि.बी. पथकाने शोध घेवुन तांत्रीक तपासावरुन मौजे – अतित, ता जि – सातारा येथुन प्रणव अरुण पवार वय ३२ वर्षे, रा मु पो किन्हई, ता कोरेगाव जि सातारा चंद्रकांत विठठल जाधव वय २८ वर्षे रा जांब खुर्द ता कोरेगाव जि सातारा या दोघांना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही आरोपीतांकडे डि.बी. पथकाने कौशल्यपुर्ण चौकशी केली असता सदरचे वाहन हे त्यांनी दहिवडी पोलीस हददीमधील कुळकजाई, ता माण जि सातारा येथुन नवीन चारचाकी वाहनाची डिलिव्हरी करणारे चालकाचे वाहन चोरी करुन ते विक्री करण्याच्या उददेशाने सातारा मध्ये आणल्याचे सांगीतले. त्यानंतर सदर इसमास ताब्यात घेवुन पंचासमक्ष सदरचे पीकअप वाहन जप्त करण्यात येवुन सातारा शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर इसमांना अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी चाकण, पुणे येथुन आणखी एक पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगुन ते देखील वाहन दाखवुन काढुन दिलेले आहे. तसेच सातारा शहर पोलीस ठाणे हददीमधुन ०२ मोटरसायकल चोरी केल्याची व बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजखाली झोपलेल्या एका परप्रांतीय युवकाचा मोबाईल व साडया चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदर वाहनांबाबत अधिक माहिती घेतली असता दहिवडी पोलीस स्टेशन व चाकण पोलीस स्टेशन पुणे येथे पिकअप वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीतांकडुन ०२ चोरीची पिकअप वाहने, ०२ चोरीच्या मोटरसायकल चोरीचा ०१ मोबाईल व २९ साडया, तसेच आरोपीतांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटरसायकल व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण २२,८२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपीतांकडुन चोरीचे ०५ गुन्हे उघडकिस आणण्यात डि.बी. पथकास यश आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सातारा तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक सातारा डॉ वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोहवा सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, मपोहवा अवघडे, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो. कॉ. संतोष घाडगे, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, आशिकेष डोळस, सुहास कदम, सुशांत कदम, मचिंद्रनाथ माने, वैभव माने यांनी केलेली आहे.







