सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दयानंद कॉलेज सोलापूर येथे क्रिकेट खेळाडूंना दिले प्रोत्साहन

जयकुमार गोरे

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) | येथे दयानंद कॉलेज क्रिकेट स्टेडियमवर येथे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश बिराजदार यांनी आयोजित केलेल्या वीरशैव लिंगायत ऑर्गनायझेशन सोलापूर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाचव्या पूर्वाचे उद्घाटन काल केले.

याप्रसंगी उपस्थित खेळाडूशी संवाद साधत त्याने प्रोत्साहन दिले क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती रुजावी संघ भावना वाढीस लागावी तसेच खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यास योग्य व्यासपीठ मिळावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा निश्चितच उल्लेखनीय आहे.
या कार्यक्रमाला अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी श्री दिलीप माने, श्री शशिकांत चव्हाण श्री राम आप्पा चिवड शेट्टी यांच्यासह स्पर्धेचे आयोजक श्री महेश बिराजदार श्री सागर कल्याण शेट्टी श्री रामचंद्र होनराव श्री गजानन होनराव श्री सिद्धराम होले श्री मधुकर चिवरे श्री नेताजी खंडागळे श्री गणनाप्पा दहिटणे श्री दयानंद बिराजदार आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here