पुणे (प्रतिनिधी अजय पवार) – पुण्यात आज कोरोनाचे 2,643 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 1,577 तर पिंपरी-चिंचवडमधील 1,066 रुग्णांचा समावेश आहे. तसेच, पुणे शहरात 33 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 13 अशा एकूण 46 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली.
पुणे शहरात शनिवारी ‘आरटीपीसीआर’ व अँटिजेन चाचणीसाठी 6,891 संशयितांचे नमुने घेण्यात आले.4आतापर्यंत 3 लाख 97 हजार 927 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत शहरात 82,170 एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1427 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 65,346 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 14,874 सक्रिय रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2,608 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सध्या 804 रुग्ण गंभीर असून, त्यापैकी 488 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान शनिवारी पुणे शहरात 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 22 पुरुष, तर 11 महिला आहेत. या मृतांचे वय 35 ते 90 च्या दरम्यान होते. हे रुग्ण कुंभारवाडा, कोंढवा, कोथरूड, आनंदनगर, दांडेकर पूल, बिबवेवाडी, चंदननगर, मुंढवा, धनकवडी, सदाशिव पेठ, उत्कर्षनगर, गंजपेठ, कसबा पेठ, घोरपडी, सोमवार पेठ, पाषाण, सिंहगड रोड, हडपसर येथील चार जण, पौड रोड, कात्रज, औंध, शनिवार पेठ व अप्पर इंदिरानगर येथील रहिवासी होते. त्यापैकी बहुतांश रुग्णांना दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह हे जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1950 वर पोहचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे नवे 1,066 रुग्ण आढळले. बाधितांची एकूण संख्या 41,392 झाली असून, सक्रिय 7,042 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 4,025 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. तर, कोरोनातून बरे झालेल्या 946 रुग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 27,166 झाली आहे. तसेच 352 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज 13 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 923 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.







