दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – दोंडाईचा रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचा
शहरातील गरजुंना गोपाल हाँटेल व पारख हाँस्पीटलजवळ अन्नदान करण्यात आले .
याप्रसंगी रोटरी सिनियर्सचे सदस्य व अन्नदान प्रोजेक्टचे चेअरमन महेंद्र चोपडा यांनी सांगितले की रोटरीचे गव्हर्नर प्रशांत जानी यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांचा वाढदिवस कोणत्याही प्रकारचे बँनर लावुन किंवा केक कापुन साजरा न करता गरजुंना अन्नदान करुन संपुर्ण रोटरी डिस्ट्रिक्टने साजरा करावा असे केले होते त्यानुसार रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व जनसहयोग रोटी बँक यांच्या माध्यमातून दोंडाईचा शहरातील गरजुंना अन्नदान व काही गरजुंना जेवणाचे डबे देण्यात आले .
कार्यक्रमाचे आयोजन रोटरी सिनियर्सचे सदस्य व जनसहयोग रोटी बँकेचे प्रमुख हुसेनभाई विरदेलवाला व प्रोजेक्ट चेअरमन महेंद्र चोपडा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया,सचिव राजेश माखिजा ,अँड नितीन अयाचीत, डॉ सचिन पारख , प्रविण महाजन , डॉ राजेंद्र गुजराथी ,जवाहर केसवानी सहकार्य केले.







