भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – शुक्रवारी दि. 21.8.2020 रोजी दुपारी 16:30 वा.सुमारास भुसावळ शहरात नाहाटा कॉलेजच्या पुढे असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गाडीत डीझल भरून चहा पिण्यासाठी पेट्रोल पंपासमोर असलेल्या रिक्षा स्टॉप जवळ फिर्यादी नामे मेहेरबान सिंग जयसिंग नायक वय-40 रा.शिरपुर तलाव धार रोड इंदौर ( मध्य प्रदेश ) हे थांबले असता 3 अनोळखी व्यक्तींनी अंदाजे 18 ते 20 वयोगटातील मुलांनी फिर्यादीस तु ईधर क्यु आया तेरा ईधर क्या काम हे असे बोलुन त्यास धमकावुन गल्ली बोळात घेवुन गेले व त्या चापटा-बुक्यांनी मारहान करून व 1) खिशातुन 10,000/- रु रोख 2) 500/- रु.कि.मोबाईल जबरी चोरुन हिसकावुन घेतले तेव्हा फिर्यादी यांच्या फिर्यादी नुसार भुसावळ बाजरपेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न 793/2020 भा.द.वी क.394,323,504,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तेव्हा या गुन्हयातील 3 संशयीत आरोपी असे दि.22.8.2020 रोजी 21:30 वा.सुमारास भुसावळ शहरात जामनेर रोड हेवन होटेल च्या मागे शाह गल्ली येथे आले असल्याची गुप्त माहीती मा.पो निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, पो.उप्प.वि.पो.अधिकारी गजानन राठोड, पो.नि.दिलीप भागवत, भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शनाखाली भु.बा.पेठ पो.स्टेशनचेस.पो.नि.अनिल मोरे, सहा.फौ.सुनिल सोवनणे पो.ना रविंद्र बि-हाडे,किशोर महाजन ,रमन सुरळकर,महेश चौधरी पो.कॉ कृष्णा देशमुख विकास सातदिवे ,प्रशांत परदेशी,गजानन वाघ अश्यांनी त्यांना ताब्यात घेतले व पुढील चौकशी साठी भुसावळ बाजारपेठ पो.स्टेला आणले सदर गुन्हयाचा तपास सहा.फौ.सुनिल सोनवणे करीत आहेत.







