साईश्रद्धा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम: चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे लोकार्पण

साईश्रद्धा प्रतिष्ठान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) । येथील सामाजिक संघटना ‘साईश्रद्धा प्रतिष्ठान, शिर्डी शहर’ यांच्या वतीने नूतन वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या आकर्षक दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन मा. श्री. विठ्ठलराव पवार सर यांच्या शुभहस्ते या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन पवार यांच्या हस्ते वितरण; कोरेगाव-शिर्डी साईमाऊली पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची उपस्थिती होती.

साईनगरीत सध्या भक्तीचा मळा फुलला असून, या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्री क्षेत्र कोरेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी या मार्गावरून चालत येणाऱ्या ‘श्री साईमाऊली पालखी सोहळ्या’चे आगमन याच वेळी झाले होते.
‘वारकरी आणि समाजसेवा’ यांचा मणिकांचन योग
यावेळी बोलताना श्री. विठ्ठलराव पवार यांनी साईश्रद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शिर्डीत येणाऱ्या भक्तांची आणि स्थानिक समाजाची सेवा करणे हेच खरे साईंचे कार्य आहे. प्रतिष्ठानने आज वारकऱ्यांच्या साक्षीने कॅलेंडरचे वितरण करून सामाजिक आणि आध्यात्मिक बांधिलकीचा सुंदर मिलाफ साधला आहे.
नूतन वर्षाचे कॅलेंडर हे केवळ तारखा पाहण्याचे साधन नसून, त्या माध्यमातून साईश्रद्धा प्रतिष्ठानने जनसंपर्क आणि समाजप्रबोधनाचा वसा जपला आहे. यावेळी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पत्रकार तुषार महाजन व शिर्डीतील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here