नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | विठेवाडी ,ता देवळा येथील ८० च्या दशकातील कै शरद जोशी यांच्या बरोबर शेतकरी संघटनेच्या चळवळीत झोकून देऊन काम करत असताना अकाली निधन झालेले शेतकरी संघटनेचे शेलार मामा म्हणून कै शरद जोशी यांनी गौरव ले कै दोधा जिभांउ यांची ३६ वी पुण्यतिथी विठेवाडी येथील क्रुष्णा वस्तीवरील निवासस्थानी असलेल्या व कै शरद जोशी यांनी अनावरण केलेल्या पुतळ्याचे पूजन विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन श्री पंडित निकम यांच्या हस्ते झाले,
यावेळी कै शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कै जिजाऊंच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले, या प्रसंगी देवळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम, डॉ जे डी पवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन श्री दिपक पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास कोकरे, नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते फुला आप्पा जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव, दिनकर जाधव, कैलास जाधव, राजेंद्र जाधव,अमर जाधव, भैय्या जाधव आदी आप्तेष्ट व सहकारी तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.







