जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । रामानंद नगर हददीत दि.02/01/2026 रोजी किरण मधुकर सुर्व रा. मारोती पार्क शिव कॉलनी हे संध्याकाळी 06.00 वाजेचे सुमारास त्यांची 60,000/- रु. किमतीची MH-19-AY-1797 काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी घेवुन पिंप्राळा बाजारात आले असता, संध्या 07.00 वाजेचे सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन CCTNS गुरनं 05/2026 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास : पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु असतांना, रामानंद नगर पोस्टेचे गुन्हे शोध पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन आरोपी नामे विक्की नंदलाल भालेराव वय-२९ रा.शंकर आप्पा नगर पिंप्राळा जळगाव व महेश राजेंद्र मेढे वय-२३ रा.रामेश्वर कॉलनी जळगाव अशांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल चौकशी केली असता, नमुद दोन्ही आरोपीतांनी वरील गुन्हयाचे फिर्यादी यांची हिरो स्प्लेंडर व जिल्हा पेठ पोस्टेस दाखल गुन्हयातील हिरो स्प्लेंडर प्रो तसेच एक हिरो डिल्क्स अश्या एकुण ०३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन दोन्ही आरोपीतांकडुन एकुण ०३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आली आहे.
नमुद गुन्हयाचे तपासात आरोपींचा शोध घेवुन ०३ मोटारसायकलचा मुददेमाल मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोनि/राजेंद्र गुंजाळ, पोउपनि/सचिन रणशेवरे, पोह/जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, योगेश बारी अशांनी सहभाग घेवुन उत्तम कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढीत तपासा मा. पोनि/राजेंद्र गुंजाळ यांचे आदेशान्वये पोह/ जितेंद्र राजपुत हे करीत आहेत.







