जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । दि.28/12/2026 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपासुन ते दि.29/12/2026 रोजीचे सकाळी 09.30 वाजेच्या दरम्यान जळगांव शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपसमोरील टि.एम. नगर येथील सर्वे नं. 511 ते 514 येथील नविन बांधकाम झालेल्या टाईट फिटींग व नळफिटींग चालु असलेल्या घराचा कडी कोंडा तोडुन नळ फिटींगचे तसेच लाईट फिटींगचे साहीत्य असे अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नेल्याने फिर्यादी यांनी दि.07/01/2026 रोजी एम. आय.डी.सी.पो.स्टे. येथे तक्रार दिल्यावरुन गु.र.नं.25/2026, भारतीय न्याय संहिता कलम 305(A), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी मा. पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउपनिरि/राहुल तायडे, पोउपनिरि/चंद्रकांत धनके, सफौ/05 विजयसिंग पाटील, पोहेकॉ/1862 रमेश चौधरी, पोकॉ/2030 गणेश ठाकरे, पोकॉ/291 नितीन ठाकुर, पोकॉ/677 राहुल घेटे, पोकॉ/342 किरण पाटील, अशांची टिम तयार करुन चोरीस गेलेले नळ फिटींगचे तसेच लाईट फिटींगचे साहीत्य व आरोपीताचा शोध घेणेकामी रवाना केले. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी व जळगांव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सिसिटिव्ही फुटेज चेक केले तसेच नेत्रम विभाग, जळगाव येथील नेमणुकीचे पोकॉ/3357 पंकज खडसे, पोकॉ/1299 कुंदनसिंग बयस, पोकॉ/485 मुबारख देशमुख यांचे मदतीने फुटेजची पाहणी करुन तसेच बातमीदारा मार्फत आरोपीताचा शोध घेवुन नमुद गुन्ह्यात आरोपी सैय्यद उबेद सैय्यद रफीक पटवे, वय-19 वर्षे, रा. मास्टर कॉलनी, जळगांव निष्पन्न झाला. त्यास विश्वासात घेवुन गुन्ह्यातील त्याचा साथीदारा विषयी विचारपुस केली असता तो विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी सैय्यद उबेद याचेकडुन एकुण 28000/- रुपये किंमतीचे नळ फिटींगचे तसेच लाईट फिटींगचे साहीत्य हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफौ/05 विजयसिंग पाटील, पोकॉ/1012 निलेश पाटील हे करित आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.







