जळगावात अवैध गुटखा वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

गुटखा

भुसावळ (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) । डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, जळगांव यांनी स्थानिक गन्हे शाखा, जळगाव येथील टिकास जळगांव जिल्हात अवैध गुटखा वाहतुक व विक्री करण्याकरीता प्रमाण वाढले असुन गोपणीय माहीती काढून अशा लोकांबर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेशीत दिले होते.

मा. राहुल गायकवाड, नेम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना गोपणीय बातमीदारा माफत बातमी मिळाली की, एक संशयीत वाहन पांढ-या रंगाचे मारोती सुझुकी कंपणीची अरटीगा वाहन क्रमांक MH-४६८१०६५ या वाहनात अवैध गुटख्याची वाहतुक होत असून सदरचे वाहन हे मुक्ताईनगर शहरातून ब-हाणपुर (म.प्र) ते छत्रपती संभाजी नगर या दिशेने जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरुन, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव कडील पथकास योग्य ती कार्यवाही करणे बाबत सुचना दिल्याने त्यावरुन लगेचच कारवाई करण्यात आली.
गिळालेल्या बातमी प्रगाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुक्ताईनगर पोलीस स्टेशनला पोहचुन त्यांना बर प्रमाणे माहीती देवून स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन कडील पथक बातमीप्रमाणे पुरनाड फटा, या ठिकाणी जावून थांबलो असता वरील वर्णनाचे व क्रमाचे संशीयत वाहन हे भरधाव वेगात पुरनाड फाट्याकडे येतांना दिसले त्यावरुन आम्ही वाहनातील चालकास हात देवून थांबविण्याचा प्रयत्न केला पंरतु तो भरधाव वेगात खामखेडा गावाकडे निघुन गेला. त्यावरुन वरील पथकाने वाहनाचा पाठलाग करुन वरील क्रांचे वाहन पांढ-या रंगाचे गारोती गुड़ की कंपणीची अरटीगा वाहन क्रमांक MH-४६८१०६५ चे वाहन थांबवून वाहन अवैध गुटखा असल्याने वाहनातोल चालक यास ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणी अरवाज नौशाद बेग (वय-३० वर्षे रा-काझी, हाऊस, खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली असून, त्याच्याजवळून १०,१९,०२०/- (दहा लाख एकोनविस हजार विस रुपये) किंमतीचा रजनीगंधा सुंगधीत पानमसाला व करमचंद प्रिमियन पान मसाला, मिरज तंबाखू, विमल पान मसालास, पानपराग पान मसाला, जाफराणी जार्दा व ताब्यातील वाहन तसेच मोवाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अभीक्षक, जळगांव, अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, जळगांव, सुभाष ढवळे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग, मुक्ताईनगर राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा जळगांव व आशिष आडसुळ पो.नि. मुक्ताईनगर पो स्टे याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सदरची कारवाई स.पो.नि जयेश पाटील, पोउनि. निलेश गोसावी, दोन्ही नेम मुक्ताईनगर पो.स्टे, पोह, विजय पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र चौधरी, सलिम तडवी, छगन तायडे, रतनहरी गिते, हमत पाटोल, सर्व नेमणुक-स्थानिक गुन्हे शाखा, जळागंव व पो.अं. गोविंद सुरवाडे, गोविंद पवार नेमणुक मुक्ताईनगर पोलीस स्टेसन अशांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here