भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनिष सोनावणे) | ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सन्मानित सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून शालेय किट वाटप प्रसंगी अध्यक्ष लोकनियुक्त ताईसो.सुनिता ताई पाटील नगराध्यक्ष पाचोरा व प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त ताईसो. रेखाताई मालचे नगराध्यक्ष भडगाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रमुख अतिथी श्री. किशोर भाऊ रायसाकळा (राज्य प्रदेश )उपाध्यक्ष ,श्री .राकेश सुतार, (विभागीय उपाध्यक्ष ), तालुका अध्यक्ष रतिलाल पाटील , पत्रकार हल्लाकृती समिती प्रल्हाद (आप्पासाहेब) पवार , जिल्हा सचिव मनीष सोनवणे यांच्या हस्ते कै.यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गावातील सरपंच श्री. दादाभाऊ वेडू पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, समाजसेवक अमोल जाधव, विकास सोसायटी चेअरमन भाऊसाहेब पाटील, मा. सरपंच सूर्यकांत पाटील,मा.स. सिताराम पवार, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच माध्यमिक विद्यालयातील चेअरमन रवींद्र निकम सर ,मुख्याध्यापक श्री. स्वप्निल निकम सर यांनी भडगाव व पाचोरा तालुक्यातील शॉल , ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी,गौतम सोनवणे, चेतन पवार, गोपाल भुई, सलाउद्दीन शेख, भास्कर पाटील, सतीश पाटील, आनंदा पाटील, नाना पाटील, ऋषिकेश अमृतकर, सूर्यकांत कदम, अशोक चौधरी या मान्यवर पत्रकारांचा सत्कार करून गौरवण्यात आले.
भडगाव चे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देऊन गेले. त्याप्रसंगी पत्रकार बांधवांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयाचे संचालक रवींद्रजी निकम सर यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन रतिलाल पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन हितेश पाटील सर यांनी केले आणि प्रल्हाद पवार यांनी आभार व्यक्त केले.







