पत्रकार दिनानिमित्त मंगळवेढाचे डी वाय एस पी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्याकडून पत्रकारांचा गौरव

पत्रकार

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | मंगळवेढा येथे पत्रकार दिना निमित्त मंगळवेढाचे डी वाय एस पी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्याकडून पत्रकारांचा गौरव या कार्यक्रमात सुरुवातीस आद्य पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कार्यकारणी निवडी करण्यात आल्या अध्यक्षपदी महेश पाटील तर सचिन हेंबाडे यांचे निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी म्हाळाप्पा शिंदे, उपाध्यक्षपदी प्रसाद कसबे, अमीर आतार, दत्तात्रय कांबळे, प्रशांत माळी, खजिनदारपदी दिगंबर गरंडे, सहकार्याध्यक्षपदी महेश कोठारे, तसेच सह खजिनदारपदी बुलंद पोलीस टाईम्स चे महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर राहुल मस्के यांची निवड करण्यात आली तसेच प्रसिद्ध प्रमुख येताळा खरबडे यांची निवड करण्यात आली.
पत्रकार संघातील माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होते. मंगळवेढा पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांनी सर्व पत्रकारांना पेन डायरी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. उपस्थित पत्रकार भीमराव मोरे हे होते .तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ. आरती कनेर यांनी 6 जानेवारी रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे पदभार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here