बेवारस पडलेला मृतदेह हा बेवारस नसून, खुन असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केले निष्पन्न

खुन

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत दि. ९ रोजी अजिंठा चौफुलीजवळील बाबा बॅटरी समोर एक बेवारस पुरुष जातीचा इसम बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याची बातमी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. त्यावरुन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांनी सदरच्या बेवारस बेशुध्द अवस्थेत पडलेल्या इसमांस उपचारार्थ शासकीय रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता, सदरच्या : इसमांस तपासुन वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले होते.

सदर बेवारस इसमांस कोणीतरी केलेल्या मारहाणीत मृत्यु झाल्याबाबत ची गोपनीय माहीती श्री राहुल गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना प्राप्त झाली होती. त्यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा अक्रम शेख, मुरलीधर धनगर, नापोशि किशोर पाटील, पोशि राहुल कोळी यांना सदरबाबत तपासाचे आदेशीत केले होते.
त्यावरुन तपास पथकाने बेशुध्दाअवस्थेत मिळुन आलेल्या पुरुषाचे ठिकाणचे आजबाजुच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रीक विश्लेषणावरुन तसेच गोपनीय सुत्रधार यांच्याकडुन माहीती प्राप्त करुन, सदरचा बेवारस इसम हा भाऊसाहेब अभिमन पवार वय ५८ वर्ष धंदा वेटर रा. मराठे गल्ली पातोंडा ता. अमळनेर जि जळगव याचा असुन ते आसोदेकर श्री मटन हॉटेल, का.उ. कोल्हे शाळेजवळ कालींका माता रोड जळगाव येथे काम करत असतात. तसेच त्यांना हाताबुक्याने मारहाण करुन व गळा दाबुन खुन करणारा इसम हा अजिंठा चौकात फिरणारा हुसेन शेख आयुब शेख वय ३० वर्ष, रा. ट्रान्सपोर्ट नगर जळगाव हा असल्याचे निष्पन्न करुन, त्याचा जळगाव शहरातील नशिराबाद, अजिंठा चौक, ट्रान्सपोर्ट नगर, नेरीनाका, रेल्वेस्टेशन, बसस्टॅन्ड परीसरात शोध घेऊन, त्यास ताब्यात घेऊन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. त्यावरुन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन सीसीटीएनएस क्रंमाक ३१/२०२६ बीएनएस २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन, नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा/अक्रम शेख, मुरलीधर धनगर, नापोशि किशोर पाटील, राहुल कोळी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here