नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | नाशिक महापालिका निवडणुकीत कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे, सत्ताधारी पक्षाच्या एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकारणापायी झालेली बिगाडी, त्यामुळे तिन्हीही पक्ष एकमेकांना पाण्यात पहाताना दिसत आहेत, नाही म्हणायला शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या युतीमुळे नाशकात भारतीय जनता पक्षाची हवा आधीच गरम झाली आहे, सत्तेत सहभागी असलेले आपलेच सहकारी पक्ष भाजपातील तगड्या बंडखोरांमुळे भाजपात मोठं आव्हान उभं आहे.
शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची दिल जमाइ मुळे भाजपच्या गिरीश महाजनांना नाशकात तरी हे दोन्ही संताजी घोरपडे व धनाजी जाधव दिसत आहेत,काल परवा झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद बघता भारतीय जनता पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे, आणखी त्यात भर म्हणून उद्धव आणि राज ठाकरे यांची प्रचंड जाहीर सभा भारतीय जनता पार्टी साठी धोक्याची घंटा ठरु शकते,असा कयास बांधला जावु लागला आहे, जुने नाशिक तसेच जुना व नवा गंगापूर रोड, पंचवटी कारंजा ,पेठ रोड परीसर मधिल प्रभाग क्रमांक सहा व सात च्या वार्डात फेरफटका मारताना लोकांच्या मनात सत्ताधारी भाजपा बद्दल असंतोष दिसून येत आहे, तपोवन व भारतीय जनता पक्षाची सत्ता सुंदोपसुंदी कुठल्या स्तरापर्यंत पोहोचली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, त्यामानाने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी चा अजित पवार यांच्या युती मुळे शहरात वेगळेच चित्र निर्माण झालं आहे,
शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसे सेना यांच झालेल मनोमिलन त्याला मिळालेली कांग्रेसची साथ जुळली तर नाशकात धक्कादायक निकाल लागु शकतो, नाशकातील अत्यंत उच्चभ्रु आणि सुशिक्षित मतदार संघ म्हणजे प्रभाग क्रमांक सहा आणि सात हे आहेत,प्रभाग क्रमांक सात मधील अ गटाचे शिवसेनेचे प्रभावीउमेदवार राजेंद्र ( नाना ) नामदेव सुर्यवंशी हे तरुण अनुभवी आणि उच्च शिक्षित उमेदवार उभे आहेत,तर ब गटात शिरसाठ रोहिणी किशोर, क गटात रकिबे वंदना उदय ड गटात पालीकेचे माजी उपमहापौर अजय भास्करराव बोरस्ते हे शिंदे गटाकडून नशिब अजमावत आहेत,
प्रभाग क्रमांक सात मधील अ गटाचे उमेदवार राजेंद्र (नाना) नामदेव सुर्यवंशी हे मुळचे बागलाणवासी, त्यांचं निवासस्थान हे देवळा व नाशिक शहरात आहे, नाशिक येथील किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल चे ते संस्थापक संचालक आहेत, तसेच नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचेअध्यक्ष आहेत , दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक्स असोसिएशन ली. मुंबई चे संचालक आहेत, देवळा मर्चंट को आपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक आहेत,श्री सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट , सप्तशृंग गड येथे विश्वस्त म्हणून दांडगा अनुभव आहे,त्याच बरोबर सातारा सैनिक स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष होते त्याच बरोबर नाशिक इंडस्ट्रीज वेलफेअर सेंटर (निवेक) देखील संचालक आहेत,व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असुन अनेक मोठे प्रोजेक्ट्स निर्माण केले आहेत, श्री राजेंद्र (नाना)सुर्यवंशी हे कै. किशोर सूर्यवंशी यांचे बंधू आहेत,दुसरे उमेदवार अजय बोरस्ते हा चेहरा सर्वांनाच परिचित आहे,त्यांनी नगरसेवक व उपमहापौर म्हणून केलेली उत्तम कामगिरी ही त्यांची जमेची बाजु समजली जाते आहे,ब गटात रोहिणी शिरसाठ तर क गटात रकिबे वंदना उदय या दोन सुशिक्षित व सुसंस्कृत महीला उमेदवार उभे आहेत, तर त्यांच्या समोर भाजपाचे आहेर आणि हिरे, पाटील कंपनीचं आव्हान आहे, सद्या तरी वार्ड क्रमांक सात मध्ये शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







