जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून रविवार (दि. ११) कासोदा पोलीस स्टेशन तसेच पोलीस पाटील संघटना कासोदा यांच्या संयुक्त विद्यमाने कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण तरुणीसाठी पोलीस भरती पूर्व सराव लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आयोजनाला कासोदा हद्दीतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. सराव परिक्षेसाठी १२५ विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस स्टेशन तर्फे परिक्षार्थीना काळा पेन, प्रश्नपत्रीका, उत्तरे सोडवण्यासाठी उत्तर पत्रीका, तसेच परिक्षा संपल्यानंतर अल्पोपहाराचे आयोजन केले होते. ह्या आयोजना बाबत परिक्षार्थीनी पोलीस प्रशासनाचे आभार मानून भविष्यात असेच उपक्रम राबविण्याची विनंती देखील केली आहे.
पोलीस भरत्ती पुर्व सराव लेखी परिक्षा उपक्रम राबविण्यासाठी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव भाग विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील, तसेच सर्व पोलीस अंमलदार व पोलीस पाटील संघटना कासोदा यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.







