साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी यांचे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात घवघवीत यश

साई गुरुकुल

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात घवघवीत यश संपादन केले आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान-गणित अध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन नुकतेच पार पडले. हे प्रदर्शन ८ व ९ जानेवारी रोजी श्री. नागेश विद्यालय, जामखेड (ता. जामखेड) येथे भरविण्यात आले होते.

यंदाच्या प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारत’ हा होता. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक व गणितीय कौशल्यांचा विकास व्हावा, तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण व शेती संरक्षण या विषयावर विचार करावा, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कार्यरत मॉडेल्स, तक्ते आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनात साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी कु. अक्षरा दिनेश बलकवडे आणि कु. नूतन मधुकर देवकर यांनी ‘पर्यावरणपूरक कीटकनाशक’ या नावाचा प्रकल्प सादर केला. विशेष म्हणजे, तालुकास्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी आपली जागा निश्चित केली होती. त्यांनी ९ वी ते १२ वी या गटामधून सहभाग नोंदवला होता.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य:
आजच्या काळातील शेतकऱ्यांची गरज ओळखून या विद्यार्थिनींनी हे ‘पर्यावरणपूरक कीटकनाशक’ तयार केले आहे. हे कीटकनाशक तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अगदी सहजतेने आणि घरगुती स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या आहेत. कमी खर्चात, म्हणजेच शेतकऱ्याला परवडतील अशा स्वरूपात हे कीटकनाशक तयार होते. ते बनवण्याची पद्धतही अत्यंत साधी-सोपी असून त्याचा उपयोग अत्यंत प्रभावशाली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड:
या प्रोजेक्टला जिल्हा स्तरावरील प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, ही बाब शाळेसाठी अत्यंत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे.
बक्षीस वितरण सोहळा:
बक्षीस वितरणाचा सोहळा राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे, शिर्डी लोकसभा सदस्य मा. खा. श्री. भाऊसाहेब वाकचौरे, अहिल्यानगर लोकसभा सदस्य मा. खा. श्री. निलेश लंके, विधानपरिषद सदस्य मा. आ. श्री. किशोर दराडे, मा. आ. श्री. सत्यजीत तांबे, मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, कोपरगावचे आमदार मा. आ. श्री. आशुतोष काळे, जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. प्रांजल चिंतामणी आणि शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. अहिल्यानगर श्रीमती संध्या गायकवाड मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन आणि आभार:
जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेल्या या प्रकल्पासाठी शाळेच्या प्राचार्य . मंगला कुऱ्हे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे चेअरमन श्री. तानाजी वामनराव गोंदकर, मा. खटके सर, शर्मा मॅडम, कुमावत मॅडम, थोरात मॅडम, अवचर मॅडम आणि इतर सर्व शिक्षकवृंद यांनीही मार्गदर्शन केले. या विद्यार्थिनींचे कौतुक करताना प्राचार्यांनी सांगितले की, “अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो.” शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या सहकार्यामुळे हे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here