इंदापूर ते आदमापूर दरम्यान नविन बस सुरू

इंदापूर

इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | इंदापूर ते आदमापूर नविन बस सुरू करण्यात आली आहे इंदापूर हून आदमापूरसाठी नव्या वेळेत नवीन बस सुरू करण्यात आली आहे ही बस इदापूरहून सकाळी नऊ वाजता इंदापूर मधून मधून सुटेल तसेच आदमापुर मधून ही बस सकाळी सात वाजता सुटेल.

ही बस इंदापूरहून वालचंदनगरला आल्यानंतर वालचंद नगर कळब ग्रामस्थांनी वालचंदनगर बस स्थानकावर बस प्रवाशांनी इंदापूर आदमापूर बस चालू केल्याबद्दल वालचंदनगर बस स्थानक येथे असणाऱ्या वाहतूक नियंत्रक दीपक खुडे व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले पुढील वेळा पत्रक पुढीलप्रमाणे ही बस इंदापूर वालचंद नगर नातेपुते शिंगणापूर दहिवडी कराड कोल्हापूर मार्गे आदमापूर जाईल व त्याच मार्गे परत येईल वालचंदनगर 10.00 वाजता नातेपुते 10.30 वाजता दहिवडी 11.30 वाजता कराडला दुपारी 2.00 वाजता कोल्हापूरला दुपारी 3.30 आणि आदमापूर येथे सायंकाळी 5.00 वाजता पोचणार आहे असे आहे वेळापत्रक इंदापूर ते आदमापूर तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री.गोसावी, वाहतूक अधीक्षक श्री.वायदंडे, वाहतूक निरीक्षक श्री.भोसले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here