भडगाव (प्रतिनिधी आमीन पिंजारी) | कजगाव येथे एसटी बस स्थानिक टॉपवर न थांबता थेट बस स्टॉपपासून काही अंतरावर थांबत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच आजारी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटी महामंडळाच्या चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रकार सर्रास घडत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे आणि सोयींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बस योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून धावपळ करावी लागत असून अपघाताचीही शक्यता वाढली आहे.
या गंभीर प्रकाराकडे एसटी महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे व संबंधित चालक-वाहकांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच कजगाव येथील बस नियमितपणे स्थानिक टॉपवरच थांबवण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी कजगाव परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.







