नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | आज दिनांक १२ जानेवारी २६ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची जयंती येथील सिद्धेश्वर विद्यालयांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली, एक आदर्श माता धैर्यवान पत्नी, एक प्रेरणादायी शिक्षिका,ज्यांनी रामायण, महाभारत, धर्मनिती, शौर्य, स्वराज्याची बीजे रोवली अशा राजमाता जिजाऊ आई साहेब व दुसरे युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदजी ज्यांनी आत्म बळ, प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्र निर्मितीचे विचार, जगाला दिले होते असे स्वामी विवेकानंद जी, याची आज जयंती साजरी करण्यात आली.
या महान विभूती स्वामी विवेकानंद, यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयामध्ये डॉ, जे. डी. पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दीपक पंडित पवार यांच्या सौजन्याने देवळा तालुक्यातील तरुण व्याख्याते ह,भ,प,प्रा श्री भगवान शिंदे महाराज यांचे विद्यार्थ्यांसाठी करियर व आध्यात्मिक विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी सहकार व शेती अभ्यासक कसमादेचे शेतकरी नेते ,कुबेरबापु जाधव , स्कूल कमिटीचे अध्यक्ष जिभाऊ नामदेव पवार, आदर्श शिक्षक संजीव पवार, सोसायटीचे नव नियुक्त गट सचिव दत्तात्रय पगार, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव,उषा फर्टीलायझर चे संचालक श्री दिपक पवार श्री हिरामण पवार, दिनेश पवार, अंकित पवार, वैजनाथ पगार, उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाजातील तरुण युवकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,स्वागत गित, दीप प्रज्वलन, स्वामी विवेकानंद व जिजाऊच्या प्रतिमेंचे पूजन करण्यात आले
याप्रसंगी कुबेर जाधव व डॉ, जे डी पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिपक पवार व कृष्णा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून आदर्श नागरिक कसा तयार होईल यासाठी संस्कारांचे बीजारोपण कसे करावे? या विषयावरती श्री,प्रा भगवान शिंदे महाराज यांनी व्याख्यानात सांगितले पत्रकार शेती अभ्यासक कुबेर जाधव ,गट सचिव दत्तात्रय पगार, आदर्श शिक्षक संजय आहेर आदर्श शिक्षक केतन आहेर, शिक्षिकेतर कर्मचारी श्री बाळू लाला माळी यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन दिपक पवार यांच्या हस्ते करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ,अशा अहिरराव यांनी केले तर आभार श्री बागुल सरानी मानले.







