रणसिंग महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर सुरू

श्रम संस्कार शिबीर

इंदापूर (तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे) । कुरवली ता. इंदापूर येथे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष श्रम संस्कार शिबीर १८ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

विशेष श्रम संस्कार शिबीराच्या उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप हेगडे, ग्रामपंचायत कुरवली चे सरपंच राहुल हनुमंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा. सुवर्णा बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दणाणे,महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here