जळगाव पोलीस दलातील उपनिरीक्षक संजय शेलार यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

राष्ट्रपती पोलीस पदक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । शहरातील पोलिस दलात कार्यरत असणारे रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ चे मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. प्रामाणिकपणे केलेल्या ३५ वर्षांच्या सेवेचा गौरव झाल्याचे, बोलले जात आहे.

संजय शेलार यांची कारकीर्द पोलीस दलातील शिस्त आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी पोलीस दलात ३५ वर्षे सेवा पूर्ण केली आहे. या ३५ वर्षांच्या काळात त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल तब्बल २४२ बक्षीसे मिळाली आहेत. संपूर्ण सेवा काळात त्यांना एकही शिक्षा, दंड किंवा ताकीद देण्यात आलेली नाही. ३५ वर्षांच्या सेवेत ते कधीही आजारी रजेवर गेलेले नाहीत.
अत्यंत शिस्तप्रिय आणि, उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here