चिंचवडच्या रागिनी राऊत व परी राऊत या प्रतिभावान किकबॉक्सिंग खेळाडूंना रोटरीच्या वतीने मदत

रागिनी राऊत व परी राऊत

पुणे (जिल्हा प्रतिनिधी रोहन सोनाळे) । जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या चिंचवडच्या रागिनी राऊत व परी राऊत या दोन प्रतिभावान किकबॉक्सिंग खेळाडू आगामी राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी तेलंगणा येथे सज्ज होत आहेत. मर्यादित आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी हार मानली नाही. यापूर्वी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने करण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर दोघींनीही सलग दोन वेळा राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावून आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

सध्याही प्रवास, राहणे व स्पर्धेचा खर्च मोठा असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन रोटरीच्या वतीने रागिनी व परी यांना दहा हजार रुपयांचा आर्थिक मदत धनादेश स्वरूपात सुपूर्त करण्यात आली.यावेळी रोटरी वाल्हेकरवाडीचे सेक्रेटरी वसंत ढवळे, प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप भालके, रोटरीचे गणेश बोरा, सचिन खोले, सदाशिव आबा जाधव तसेच जयहिंद बँकेचे संचालक राहुल भोईर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन दिले.
समाजात अशा अनेक गुणवान खेळाडूंना फक्त योग्य वेळी थोडेसे आर्थिक व नैतिक पाठबळ मिळण्याची गरज असते. अशा होतकरू खेळाडूंना संधी मिळावी, देशाला उत्तम खेळाडू घडावेत यासाठी दानशूर व्यक्तींनी रोटरीच्या सामाजिक व क्रीडा प्रोत्साहन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरीच्या वतीने करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here