शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी कोपरगाव विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण शिवसैनिकांनी एकत्र येत भोजडे गावात मोफत आरोग्य चिकित्सा व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले, त्यास पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांनी सहभागी होत उस्फुर्त प्रतिसाद दिला. यामुळे जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली दिल्याने आज दिवसभर तालुक्यातील सामान्य जनतेत शिवसैनिकांचं कौतुक होताना पाहायला मिळाले. अशाच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेला जे हवं, ते देता आलं पाहिजे म्हणून शिवसेनाप्रमुखांसारखं समर्पित जीवन जगावं, असा संदेश जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला. यावेळी तालुक्यातील सर्वं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम वंदनीय शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिबिराचे उदघाट्न करून मुंबई येथून शिवआरोग्य सेनेच्या माध्यमातून आलेल्या तज्ञ् डॉक्टरांच्या टीमकडून सर्वं गरजू रुग्णांना लाभ देण्यात आला. यावेळी अनेक जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. वंदनीय बाळासाहेबांच्या आठवणीने काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेवर महाराष्ट्र पुढे जातोय. सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी आपलं योगदान कधीही व्यर्थ जाणार नाही, अशी भावना उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील तमाम युवाशक्ती आपल्या विचारांचा अमूल्य ठेवा जतन करते आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वं निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार उपस्थित सर्वं शिवसैनिकांनी करत वंदनीय शिवसेनाप्रमुखांना अनोखी मानवंदना दिली. यानंतर उपस्थित सर्वं प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पदाधिकारी जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, तालुकाप्रमुख गंगाधर राहाणे व संजय दंडवते यांच्यासह आरोग्य सेनेचे डॉ. शरद चव्हाण व डॉ. रविंद्र चव्हाण, उपतालुकाप्रमुख विवेक कुलकर्णी व बाबासाहेब चौधरी, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जावळे व तालुका संघटक प्रवीण चौधरी, तालुका प्रसिद्धीप्रमुख तान्हाजी मामा लामखडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक अशोक पवार व तालुका संघटक सचिन मलिक,वारी गावप्रमुख तान्हाजी थोरमिसे, गटप्रमुख विठ्ठलतात्या निकम, गणप्रमुख सुधाकर मंचरे, भोजडे शाखाप्रमुख शंकर सिनगर, दहेगाव शाखाप्रमुख मच्छिन्द्र बागल, उक्कडगाव शाखाप्रमुख नंदू निकम, लोकनियुक्त सरपंच सुधाकर वादे, पत्रकार प्रशांत टेके यांच्यासह पंचक्रोशीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश वाळुंज यांनी तर शंकर सिनगर यांनी आभार मानले.







