धरणगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी पोलिसांनी ४८ लाख २२ हजार २६४ रुपयांचा गुटखा केला जप्त

पाळधी पोलिसांनी

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) । धरणगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून धरणगाव तालुक्यातील सावदे शिवारात एका कंटेनरचा थरारक पाठलाग करून तब्बल ४८ लाख २२ हजार २६४ रुपयाच्या प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे

या कारवाईत गुटख्यासह २५ लाखाचा कंटेनर असा एकूण ७३ लाख २२ हजार २६४ रुपयाच्या मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव महामार्ग वरून गुटख्याची मोठी खेप जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी महामार्गावर पाळत ठेवली संशयाद पद कंटेनर ( क्रमांक एम एच १८ बी जी ७५५८ येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवण्याच्या प्रयत्न केला मात्र पोलिसांना पाहताच चालकाने कंटेनर न थांबवता वेगाने पळवून नेला
यानंतर पाळधी पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने या कंटेनरचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला होता अखेर सावदे शिवारात पोलिसांनी मोठ्या शिताफीने कंटेनर अडवण्यात यश मिळवला कंटेनर ची तपासणी केली असता १२८ मोठ्या गोण्यामध्ये प्रतिबंधित गुटखा लपवलेला असल्याचे आढळून आले पोलिसांनी तात्काळ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण मालाचा पंचनामा करण्यात आला
याप्रकरणी कंटेनर चालक प्रदीप भटू पाटील राहणार साक्री जिल्हा धुळे याला पोलिसांनी अटक केले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि पाळधी पोलीस चौकीच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली या गुटख्याचे उगमस्थान कोठे आहे आणि हा माल कोणाकडे जात होता याचा पोलीस अधिक तपास करत आहेत महामार्गावरील या धाडसी कारवाईमुळे गुटखे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here