गणेशवाडी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

प्रजासत्ताक दिन

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । गणेशवाडी ( वडूज ) ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात “प्रजासत्ताक दिन हा आपल्या लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा दिवस असून विद्यार्थ्यांनी शिस्त, देशप्रेम व सामाजिक जबाबदारी जोपासावी,” असे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. या प्रसंगी शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रजासत्ताक दिन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here