जळगाव (संपादक सुनिल पाटील) । आज २६ जानेवारी रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिववंदन फाउंडेशन तर्फे छ.शिवाजीनगर येथील काळे नगर मध्ये भारत माता पूजन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे व प्रमुख पाहुणे म्हणून इंदौर येथील व्यवसायिक चंद्रकांत कुंजिर यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक विजय जगताप व निलेश तायडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजू मामा भोळे(आमदार) यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना स्वावलंबन व स्वदेशी वस्तू वापरण्याविषयी मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले तर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ व शुभ्रा विशाल वाघ या शालेय विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनाची माहिती देत मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर माजी नगरसेवक संजय राठोड,फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड,उपाध्यक्ष विशाल वाघ,शिवसेनेचे गजानन मालपुरे,दिलीप नाझरकर,भगवान सोनवणे,गणेश बाविस्कर, महेश चौधरी, नरेंद्र भोसले,विनायक पाटील,कामिल खान,दिपक सुरळकर(सर) यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमासाठी शिववंदन फाउंडेशनचे सदस्य रवींद्र पाटील, संदीप पवार (सर),समीर खाटीक,माजी सैनिक मुकेश भालेराव,वाल्मीक वाघ,आशिक जोहरे,दिलीप माळी,विजय चौधरी, मनोज जाधव,अंशू वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








