देवळा तहसिल येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात; तहसिलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण

देवळा
तहसिलदार श्री मिलिंद कुलकर्णी हे ध्वजारोहण करतांना...

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) । देवळा तालुक्यातील विविध कार्यालये, पोलिस ठाणे कै, रामरावजी आहेर महाविद्यालय आदी ठिकाणी तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले,वाजगाव रोड येथील तहसील कार्यालयात देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते ७७ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले,

यावेळी तालुक्यातील विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच इतर सर्व प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री पाखरे,नायब तहसीलदार बबनराव अहिरराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब देवरे, जेष्ठ पत्रकार संजय देवरे,प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव,नायब तहसीलदार शेजुळकर, पुरवठा अधिकारी शारदा गावंडे, समाधान पवार,कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे समन्वयक भगवान जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास कोकरे, आदी उपस्थित होते, देवळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक श्री सार्थक नेहते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तहशिल कार्यालयात सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना चहापाणी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here