मोठ्या बंधूंच्या स्मृतिप्रित्यर्थ महाजन कुटुंबियांकडून ज्येष्ठ नागरिकांना महाप्रसाद

ज्येष्ठ नागरिकांना

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सख्या मुलालाही आईवडीलांसाठी वेळ नाही. मात्र अशा वातावरणात शहरातील प्रमोद महाजन यांनी सर्वांना आदर्शवत असा कार्यक्रम केला आहे. लेवा समाजात प्रथमच असा कार्यक्रम झाला असल्याने, समाजाकडून प्रमोद महाजन यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रमोद यांचे मोठे बंधू उमाकांत दयाराम महाजन यांना दि. १६ जानेवारीला अमेरिकेत देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रमोद दयाराम महाजन व त्यांची पत्नी सौ.ललिता महाजन यांनी आज (दि.२८) चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या ३५० सभासदांसाठी महाप्रसादाचे आयोजन करत आपल्या बंधूंना आदरांजली वाहिली. याप्रसंगी चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डॉ.के.के. भोळे यांच्यासह सदस्यांनी महाजन दाम्पत्याला आशिर्वाद देवून, या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here