विद्यार्थ्यांनी भारतराष्ट्राचा सुसंस्कृत वारसा जपावा – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

भारत

पुणे (उपसंपादक प्रभाकर निकम) । भारत देशाने २६ जानेवारी १९५० ला संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. व सर्वसामान्य जनतेला संविधानाचे अधिकार बहाल केले. प्रजासत्ताक दिन म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, विविधतेतून एकता,व लोकशाही साजरा करण्याचा एक राष्ट्रीय सण आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी स्वातंत्र्य सैनिक ,राष्ट्रभक्त व क्रांतिवीरांचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर अन्न अक्षर ,आरोग्य व आचरण याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन सुदृढ आरोग्य जपावे . शिक्षणाबरोबर भारताचा सुसंस्कृत वारसा जपणे ही गरजेचे आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीर देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी , राष्ट्रभक्तांनी यज्ञ, दान, तप ,कर्म केले, निष्काम कर्मयोग साधला व वेळप्रसंगी आपल्या आत्म्याचे बलिदान दिले. या सर्व गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा जपावा असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.
येथे एंजल हायस्कूल च्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रीना देशमुख मॅडम, उपमुख्याध्यापिका प्रिशीला जॉन मॅडम, श्वेता खाडे मॅडम, सुनील रसाळ सर, उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम केले. याप्रसंगी एंजल हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. शेवटी आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.भारत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here