रुग्ण हक्क परिषद, केंद्रीय कार्यालय कामकाज समितीत दहा सदस्यांचा समावेश

पुणे-सोगावकर – रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालय कामकाज समितीची आज संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्बांधणी करण्यात आली. केंद्रीय कार्यालय मुख्य सचिव दीपक पवार यांच्यासह पुणे जिल्हा अध्यक्ष पल्लवी मोहोळ, पुणे शहर अध्यक्ष मनीषा तिखे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय गायकवाड, पुणे शहर उपाध्यक्ष अपर्णा साठे, विकास साठ्ये, महारजत अर्बनच्या संचालिका नम्रता पवार, कार्यालयीन उपसचिव सुचिन्द्र कर्वे, कार्यालयीन संपर्क आणि प्रसिद्धी प्रमुख दिव्या कोंतम आणि अर्चना प्रधान यांचा कामकाज समितीत सदस्यपदी समावेश करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश कमिटीतील पदाधिकारी आणि आणि सर्वच जिल्हा आणि तालुका कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना कार्यालयीन व परिषदेच्या कार्यात ही दहा सदस्यीय कमिटी मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here