जळगावात ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’निमित्त पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली; १६० कर्मचाऱ्यांचा हेल्मेटसह सहभाग

हेल्मेट रॅली

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर तेजस भंगाळे) । शहरात सुरू असलेल्या ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६’ (Road Safety Week 2026) अंतर्गत आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक जळगाव डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीद्वारे नागरिकांना हेल्मेट वापराचा आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यात आला.

आज दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी 16.00 वाजताच्या सुमारास या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १६० पोलीस अंमलदार आपल्या मोटारसायकलसह सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने हेल्मेट परिधान करून ‘आधी स्वतः शिस्त, मग इतरांना धडा’ असा आदर्श जळगावकरांसमोर ठेवला.
रॅलीचा मार्ग:सदर रॅलीची सुरुवात पोलिस मुख्यालय येथून मा.श्री.डॉ. महेश्वर रेड्डी सो पोलीस अधीक्षक जळगाव यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर झाली. त्यानंतर ही रॅली आकाशवाणी चौक,काव्यरत्नावली चौक, गाडगे बाबा चौक मार्गे, महाबळ चौक येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या या पोलीस ताफ्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे, याबाबत जनजागृती करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here