नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) । गिरणा नदीवर के टि, वेअर व्हावे अशी विठेवाडी/सावकी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केलीली मागणी अखेर पूर्ण झाली आहे, अजुनही एक के टि वेअर चे काम अपूर्ण आहे , ते या वर्षी मार्गी लागेल,अशी परिस्थिती आहें.
विठेवाडी,सावकी दरम्यान असलेल्या गिरणा पुलाच्या पक्ष्चिम बाजूला बांधण्यात आलेल्या,व १७/५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे,१२० मिटर लांब व ४० दरवाजे, तसेच १२० मिटर हुन अधिक लांब असलेल्या भुमिगत तसेच २/४० मी, उंचिनच्या बंधाऱ्यामुळे विठेवाडी ,सावकी, झिरे पिंपळ, शिवारातील तुषार्थ शेतकरी व आम जनतेला सिंचनाचा लाभ होईल, नवीन कोल्हापूर टाइप बंधाऱ्याचे जलपुजन आणि लोकार्पण सोहळा चांदवड/देवळा विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ राहुल दादा आहेर , प्रादेशिक जल संधारणा अधिकारी मा हरीभाऊ गिते, जिल्हा जल संधारणा अधिकारी, राजाराम झुरावत,उमराणा बाजार समितीचे माजी सभापती चंदु देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते जलपुजन करण्यात येणार आहे, तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विठेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नानाजी पवार,उप सरपंच ईस्वर निकम, सोसायटी चेअरमन पि डी निकम,मा चेअरमन कुबेर जाधव, विलास निकम, राजेंद्र निकम,शशि निकम, धनंजय बोरसे व इतर ग्रामस्थांनी केले आहे,
सोमवार दिनांक २/२/२०२६ दुपारी ३:३० वाजता विठेवाडी/सावकी गिरणा नदीवर उपस्थित राहावे असे आवाहन विठेवाडी/सावकी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.







