नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | दि ,२ फेब्रुवारी रोजी विठेवाडी येथील विठेवाडी सावकी दरम्यान असलेल्या गिरणा नदीवरील नवीन बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांचे जलपुजन देवळा चांदवडचे आमदार डॉ राहुल दादा आहेर, तसेच जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता हरीभाऊ गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या समवेत विधिवत करण्यात आले,
यावेळी उमराणे बाजार समितीचे सभापती चंदु देवरे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी विठेवाडी सावकी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, एका के टि वेअर चे काम पूर्ण झाले, अद्याप एक बाकी आहे, तोही पुर्ण होईल,परंतु अतिशय जुना व जुन्यात आणि दगडी बांधकाम असलेला ७० ते ७५ वर्ष जुना असलेला,फड बागायत क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगडी बंधाऱ्याची अतिशय दुरावस्था झाली आहे, अनेक वेळा निवेदंन देऊनही अद्याप पर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय स्तरावर दुरुस्ती संदर्भात काहीही कार्यवाही झाली नाही, ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी आ , डॉ राहुल आहेर तसेच विभागीय जल संधारणा अधिकारी श्री हरीभाऊ गिते सो, यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच यावेळी बंधारा दुरुस्ती बाबतीत चर्चा केली, या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी जल संपदा अधिकारी क्षी हरीभाऊ गिते यांना साकडे घातले,असता पुढील आठवड्यात या दुरुस्ती कामाच्या बाबतीत तुम्हाला कळवतो असं स्पष्ट आश्वासन हरीभाऊ गिते यांनी शिष्टमंडळाला दिले आहे, यावेळी उमराणा बाजार समिती सभापती चंदु देवरे,खामखेड्याचे मा संरपंच आण्णा पाटील शेवाळे, अरुण भाऊराव शेवाळे,सावकी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते धनंजय बोरसे, शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, कैलास कोकरे,भउर येथील प्रगतिशील शेतकरी मिलिंद पवार, आदी उपस्थित होते,सदर बंधारा दुरुस्तीसाठी योग्य ती कारवाई नक्कीचं केली त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असे आश्वासन चर्चे दरम्यान अधिक्षक अभियंता हरीभाऊ गिते यांनी स्थानिक शेतकरी कुबेर जाधव व आणा् पाटील शेवाळे ( खामखेडा)यांना देण्यात आले आहे,







