लोकशाहीचा उत्सव: ‘बुलंद पोलीस टाइम्स’चे क्राईम रिपोर्टर राहुल मस्के आणि सौ. अल्का मस्के यांनी बजावला मतदानाचा हक्क

बुलंद पोलीस टाइम्स

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) |महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी आज, ७ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. या लोकशाहीच्या उत्सवात आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली होती.

“मतदान हा केवळ आपला हक्क नसून ते एक पवित्र कर्तव्य आहे. सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे, तरच आपण सक्षम लोकशाहीची अपेक्षा करू शकतो.”
– राहुल मस्के
(क्राईम रिपोर्टर, बुलंद पोलीस टाइम्स)

लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद गट क्रमांक ५५ आणि पंचायत समिती गण ११० अंतर्गत येणाऱ्या मतदान केंद्र क्रमांक १२७ (मल्लेवाडी) येथे ‘बुलंद पोलीस टाइम्स’ महाराष्ट्र राज्याचे क्राईम रिपोर्टर राहुल मस्के यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्हा ग्राहक संघटनेच्या अध्यक्षा सौ. अल्का राहुल मस्के आणि त्यांची सुकन्या प्रणोती मस्के यांनीही मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान दिले.
प्रशासकीय शिस्त आणि मतदारांचा उत्साह
मल्लेवाडी येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पत्रकारितेच्या माध्यमातून गुन्हेगारी विश्वातील बातम्यांवर नजर ठेवणारे राहुल मस्के आणि ग्राहक हक्कासाठी लढा देणाऱ्या सौ. अल्का मस्के यांनी स्वतः रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांच्या या कृतीमुळे परिसरातील तरुण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल मस्के आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केल्यानंतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनाचेही कौतुक केले.गणेश धनवडे
दिव्यांगानेही बजावला मतदानाचा हक्क
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील दिव्यांग असणाऱ्या गणेश धनवडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे आपण दिव्यांग असतानाही मतदानाचा हक्क बजावला असून सर्वसामान्य ही मतदान करावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here