अहिल्यानगर (प्रतिनिधी तुषार महाजन) । शिर्डीत श्री साईबाबांच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होत असतात आता ह्या उत्सवांमध्ये शिर्डी परिक्रमेची भर पडली असून दर वर्षी १३ फेब्रुवारीला होणारा हा सोहळा वर्षानुवर्षे भव्य दिव्य होत असून श्री साईबाबांच्या ह्या ऐतिहासिक परिक्रमा सोहळ्यासाठी अनेकजण आपल्या आपल्या परीने योगदान देत बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात.
शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीने यावर्षी अनोखी कल्पना समोर आली असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना शिर्डी परिक्रमा महोत्सव नावाचे स्टिकर चिटकवून शिर्डी परिक्रमा देशभरात पोहोचवण्याची अनोखी संकल्पना या निमित्ताने सोसायटीच्या वतीने राबविण्यात आली आहे.
आज या स्टिकरचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे,चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते,सर्व संचालक मंडळ तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते







