
नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | विठेवाडी,सावकी,खामखेडा येथील स्थानिक शेतकरी बांधवांच्या सातत्याने होत असलेल्या मागणी नुसार आ, डॉ, राहुल आहेर यांच्या सुचनेनुसार व जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता हरीभाऊ गिते यांच्या आदेशाने तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे.
काल परवा झालेल्या जलपुजणा नंतर , स्थानिक शेतकऱ्यांनी कुबेर जाधव, धनंजय बोरसे,आणा ्पाटि्ल,व इतर शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली मा, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता हरीभाऊ गिते यांची भेट देऊन जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्यांच्या दुरुस्ती अथवा त्याला लागूनच नवीन कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका स्थानिक शेतकरी (इंजिनिअर) कुबेर यांनी मांडली, ही बाब आ, डॉ, राहुल आहेर यांच्याही ही बाब लक्षात आणून दिली असता अधिक्षक अभियंता हरीभाऊ गिते यांनी तातडीने दखल घेतली व स्थानिक कर्मचाऱ्यांना दुरुस्ती व तसेच नवीन कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले,
त्यानुसार, युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू केले, त्याबद्दल उभयतांचे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, गिरणा नदीवर अजुन दोन कोल्हापूर टाइप बंधाऱे सावकी, आणि भउर खामखेडा शिवारात प्रस्तावित आहेत,त्या बरोबर जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती अथवा त्याला लागूनच नवीन कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांचे निर्मिती प्रस्तावित असून त्यामुळे विठेवाडी, भउर,सावकी खामखेडा या चारही गांवाच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा सुकन्यास मदत होईल,त्याद्रुष्टीने जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशाशनाचे आभार मानले आहेत.






