नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘कलारंग २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल

जळगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनोज नाले) | नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर .माध्यमिक विभाग आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलारंग-२०२६’ मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक जल्लोषात पार पडले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष डॉ. विकास चौधरी यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून नशिराबाद चे नगरसेवक व बांधकाम सभापती विकास पाटील, पाणीपुरवठा सभापती कीर्तीकांत चौबे, अर्थ समिती सभापती मनोज पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नशिराबाद चे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपकार्याध्यक्षा श्रीमती प्रमिला महाजन, उपाध्यक्ष विनायक वाणी, सचिव मधुकर चौबे, ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी, श्रीमती सुनीता पाटील राजेंद्र पाटील, भोजराज पाटील, डॉ. संदीप महाजन, ॲड. प्रदीप देशपांडे, जे. वाय. महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.’कलारंग’ अंतर्गत तीन दिवस विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

न्यू इंग्लिश स्कूल
पहिल्या दिवस : प्राथमिक विद्यामंदिर विभागाचे कार्यक्रम
दुसरा दिवस (६ फेब्रुवारी २०२६): कार्यक्रमाची सुरुवात रंगमंच पूजन आणि ‘वंदे मातरम्’ या सामूहिक गीताने झाली. लहान गटातील मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘प्रथम तुला वंदितो गणराया’, ‘शिवबाचे नाव रं…’, ‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’ अशा विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर केली.
तिसरा दिवस (७ फेब्रुवारी २०२६): मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेने दिवसाची सुरुवात झाली. यामध्ये कोळी नृत्य, ऑपरेशन सिंधूर, कॉमेडी गीत, शिवबागीत, वाघ्या मुरळी नृत्य, आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित सादरीकरण करण्यात आले. ‘गणेश वंदना’, ‘पिंगा ग पोरी पिंगा’, माय भवानी ‘साऊथ इंडियन रिमिक्स’ अशा गाण्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. तसेच कार्यक्रमादरम्यान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या रोहनीश पाटील, रुचित माळी, देवांश कोलते व भूमेश पवार या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी यशश्री कोष्टी व गजानन जंगम आणि त्यांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापिका सुनीता बनसोडे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाचपांडे, सांस्कृतिक समिती प्रमुख आर. ओ. चौधरी, आर. एल. पाचपांडे, एस. बी. रत्नापारखे, जे. एस. पगारे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन . वैशाली पाचपांडे, शीतल चावरे, पूजा पाटील, सुनीता शिवरामे आणि जयश्री चौधरी तसेच कार्यक्रमाचे प्रसिद्धी समितीचे सौ सीमा पाटिल आणि भिलाला सर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.शाळेचे हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here