जळगाव (संपादक सुनिल पाटील) । शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुलात पार पडलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव व नंदुरबार केंद्रातून गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, नंदुरबार या संस्थेच्या स्वराची कहाणी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच विद्या फाउंडेशन संचालित विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव या संस्थेच्या काजव्यांचे स्वप्न या नाटकास द्वितीय पारितोषिक, सुधाकर दुसाने फाउंडेशन या संस्थेच्या गाठोड्याचं गुपित या नाटकासाठी तृतीय पारितोषिक, जीवन विकास समा. संस्था आर. बी. पाटील विद्यालय, जळगाव या संस्थेच्या रद्दी या नाटकासाठी चतुर्थ पारितोषिक, तसेच महाराणा प्रताप विद्यालय, भुवावळ या संस्थेच्या हे तुम्हीही करु शकता या नाटकासाठी पाचवे पारितोषिक प्राप्त जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या पाचही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव व नंदुरबार केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक नागसेन पेंढारकर (नाटक- स्वराची कहाणी), द्वितीय पारितोषिक विशाल जाधव (नाटक- काजव्याचे स्वप्न ), तृतीय पारितोषिक दिशा ठाकूर (नाटक- गाठोड्याचं गुपित) यांना तर उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रभूदत्त दुसाने (नाटक- गाठोडयाचं गुपित) व तनिष्का पेंढारकर (नाटक- स्वराची कहाणी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पूर्वा जाधव (नाटक- सुसू), निर्गुणी बारी (नाटक- पुस्तक एके पुस्तक), खुशी चौधरी (नाटक- आदिंबाच्या बेटावर), प्राजक्ता सुरवाडे (नाटक- चिंगी), सायली जुमडे (नाटक-स्वराची कहाणी), निखिल गुरव (नाटक- हे तुम्हीही करु शकता), ऋषिकेश शिंदे (नाटक – रद्दी), चिराग पाटील (नाटक-द डार्क डेव्हिल), ओमविलास निकुंभ (नाटक- काजव्याचे स्वप्न), अर्णव चित्ते (बदलू आम्ही गोष्टला) यांना मिळाले आहे.
तांत्रिक बाजूंची पारितोषिके प्रकाश योजना प्रथम पारितोषिक मनोज सोनार (नाटक- स्वराची कहाणी), द्वितीय पारितोषिक – श्याम चव्हाण (नाटक- काजव्याचे स्वप्न ), तृतीय पारितोषिक जितेश जावरे (नाटक- हाका नाका माका नाका), नेपथ्य : प्रथम पारितोषिक संगिता ब्राम्हणे – पेंढारकर (नाटक- स्वराची कहाणी), द्वितीय पारितोषिक राहुल भारंबे (नाटक- खेळ फुलपाखरांचा), तृतीय पारितोषिक भाग्यश्री राजपूत ( नाटक – रद्दी), रंगभूषा : प्रथम पारितोषिक पूनम जावरे (नाटक-भक्ती), द्वितीय पारितोषिक योगेश लांबोळे (नाटक – काजव्याचे स्वप्न), तृतीय पारितोषिक आरती माळी (नाटक- बदलू आम्ही गोष्टीला), वेशभूषा : प्रथम पारितोषिक रेवती जावरे (नाटक- आदिंबाच्या बेटावर), द्वितीय पारितोषिक शिवाजी माळी (नाटक- जय हो फॅन्टसी), तृतीय पारितोषिक श्रृती आढे (नाटक- धोका दिसतोय ना ! ), संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक यतीन पाटील (नाटक- काजव्याचे स्वप्न ), द्वितीय पारितोषिक अमोल ठाकूर (नाटक – पुस्तक एके पुस्तक), तृतीय पारितोषिक वैभव वारके (नाटक- हे तुम्हीही करु शकता) यांना मिळाली आहेत.
दि. २० जानेवारी ते २८ जानेवारी, २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ६१ बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अमजद सय्यद (बीड), प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजीनगर) आणि वंदना जीवने (नागपूर) यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पारितोषिकप्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले आहे. बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि बालकलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार बालनाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व बालकलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.







