ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | पोलीस आयुक्त, ठाणे यांनी अवैध हत्यारे बाळगणाऱ्याविरुद्ध विशेष मोहीम राबवुन कडक कारवाई करण्या संदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहिम राबवुन खालीलप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदर मोहीमेअंतर्गत पोहवा / अमोल देसाई यांना मिळालेली गोपनीय माहिती त्यांनी वपोनि / जनार्दन सोनवणे यांना दिली. त्यानंतर मा. वरिष्ठांची रितसर परवानगी घेवुन वपोनि /सोनवणे यांनी सपोनि / सोमनाथ कर्णवर पाटील, पोउपनि / राजेंद्र निकम व पथकास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने योग्य ती शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सदर पथकाने सापळा कारवाई केली असता, दिनांक ०२/०२/२०२६ रोजी १५:५५ वा. चे सुमारास माणकोली नाक्याकडुन डोंबिवली बायपास कडे जाणाऱ्या रोडवर, जय बारकुला देव चौक, वेहळे-भाटाळे, ता. भिवंडी, जि.ठाणे येथे आरोपी नामे सोहील बेग शोराब बेग मिर्झा, वय २० वर्षे, रा. वॉर्ड नं १०, आलमपुर, लहारबेलमा, जि. भिंड, राज्य मध्यप्रदेश याचेकडे कोणताही परवाना नसताना ४,०८,०००/- रू. किमतीचे एकुण ०४ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे असे स्वतःच्या कब्जात बाळगले असतांना मिळून आला.
सदर इसमाविरूद्ध नारपोली पोलीस ठाणे गुन्हा नोंद कमांक ८६/२०२६ शस्त्र अधिनियम चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचा तपास पोउपनि / राजेंद्र निकम हे करीत आहेत.यातील अटक आरोपीत यांचेकडून जप्त करण्यात आलेले अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे कोणाकडुन आणली? कोणास विक्री करणार होते? या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे. अटक आरोपीची दिनांक ०९/०२/२०२५ रोजीपावेतो पोलीस कस्टडी मंजुर आहे.
सदरची कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, रविंद्र दौंडकर, सहा. पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि / निलेश मोरे, सपोनि/सोमनाथ कर्णवर-पाटील, पोउपनि/राजेंद्र निकम, पोउपनि/दिपक डुम्मलवाड, ग्रैंडपोउपनि / मोहन परब, पोहवा /अमोल देसाई, पोहवा/संदीप चव्हाण, पोहवा / हरीष तावडे, पोहवा/नंदकिशोर सोनगिरे, पोहवा/अमोल पवार, पोहवा/हुसेन तडवी, पोहवा/अजय सपकाळ, पोहवा/अमित सपकाळ, पोहवा /अभिजीत मोरे, पोहवा/गिरीष पाटील, पोशि/आबाजी चव्हाण, चापोना / अनुप राक्षे, मपोहवा / शिल्पा कसबे, मपोशि / कोमल लादे यांनी केली आहे.







