ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | पोलीस आयुक्त, ठाणे यांनी अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवुन कडक कारवाई करण्या संदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहिम राबवुन खालीलप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदर मोहीमेअंतर्गत पोहवा / अमोल देसाई यांना मिळालेली गोपनीय माहिती त्यांनी वपोनि / जनार्दन सोनवणे यांना दिली. त्यानंतर मा. वरिष्ठांची रितसर परवानगी घेवुन वपोनि /सोनवणे यांनी सपोनि / सोमनाथ कर्णवर पाटील, पोउपनि / दिपक डुम्मलवाड व पथकास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने योग्य ती शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सदर पथकाने दिनांक २३/०१/२०२६ रोजी पहाटे ०३:०५ वा.चे सुमारास हयुमिनीटी पब्लीक स्कुलच्या समोर, शिळ फाटयाकडुन दिव्याकडे जाणारे रोडवर, दिवा, ठाणे येथे पुरूष आरोपी तलत वजाहत रसुल सय्यद वय ४७ वर्षे, रा. खर्डी गांव, ठाणे यास शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीच्या कब्जात ६,९४,४०,०००/- (सहा कोटी चौऱ्यान्नव लाख चाळीस हजार) रू किमतीचा १ किलो ७३६ ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्री करणेकरीता बाळगला असताना मिळून आला.
सदरबाबत शिळडायघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ५२/२०२६ एनडीपीएस कलम ८ (क), २१(क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद गुन्हयात अटक आरोपीचा साथीदार मोहमंद खान अहमद खान महाडीक, वय ६७ वर्षे, रा., कुर्ला, मुंबई यास देखील अटक करण्यात आली असुन यात आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांची साखळी असल्याने निष्पन्न झालेले आहे. नमुद गुन्हयाचा तपास सपोनि /सोमनाथ कर्णवर-पाटील हे करीत आहेत.
यातील अटक आरोपी याचेकडून जप्त करण्यात आलेला “हेरॉईन” हा अंमली पदार्थ कोणाकडुन आणला?, कोणास विक्री करणार होते? या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, रविंद्र दौंडकर, सहा. पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि / निलेश मोरे, सपोनि/सोमनाथ कर्णवर-पाटील, पोउपनि/राजेंद्र निकम, पोउपनि/दिपक डुम्मलवाड, ग्रैंडपोउपनि/मोहन परब, पोहवा/अमोल देसाई, पोहवा/संदीप चव्हाण, पोहवा/हरीष तावडे, पोहवा/नंदकिशोर सोनगिरे, पोहवा /अमोल पवार, पोहवा/हुसेन तडवी, पोहवा/अजय सपकाळ, पोहवा/अमित सपकाळ, पोहवा /अभिजीत मोरे, पोहवा/गिरीष पाटील, पोशि/आबाजी चव्हाण, चापोना / अनुप राक्षे, मपोहवा / शिल्पा कसबे, मपोशि / कोमल लादे यांनी केली आहे.







