‘मालवणी महोत्सवा’त मंत्री नितेश राणे यांनी ग्राहकांशी साधला संवाद

नितेश राणे

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । शहरात सध्या मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या ‘मालवणी महोत्सवा’ला मंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सीताराम राणे यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर संपूर्ण महोत्सवात फिरून कोकणी कला आणि खाद्यसंस्कृतीची पाहणी केली.

मंत्री नितेश राणे यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. कोकणी उत्पादने, मालवणी मसाले आणि खाद्यपदार्थांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. नितेश राणे आणि सीताराम राणे यांचे महोत्सवाच्या ठिकाणी आगमन होताच त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवाच्या मुख्य स्टेजवर नितेश राणे यांचे आयोजन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी संयोजकांनी त्यांचे आभार मानले आणि महोत्सवाचा गौरव वाढवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना मालवणी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. ठाणेकरांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here