पुरस्कार मिळाल्याने सामाजिक जबाबदारी वाढते – पोलीस निरीक्षक गडकरी

पुरस्कार

पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | सामाजिक काम करताना मिळालेले पुरस्कार हे सामाजिक जबाबदारी वाढवणारे असून माझ्या कार्यक्षेत्रापासून जवळच असणाऱ्या मनिषाताई चव्हाण यांनी जागरण गोंधळात डोक्यावर समई आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी घेऊन नृत्य करणे , म्हणजे पारनेर च्या मातीतील सोनं असल्याचे गौरव उदगार सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी काढले.

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील दिवंगत पहिलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवजयंती व संत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . अध्यक्षस्थानी ॲड . भूषण बऱ्हाटे होते , यावेळी विचार पिठावर कोतवाली पोलिस स्टेनशच्या सहायक पोलिस निरिक्षक तेजश्री थोरात ,, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, पुणे ग्रामीण वालचंद नगर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रतिलाल चौधर , जेष्ठ सरकारी वकील सुरेश लगड व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती गडकरी पुढे बोलताना म्हणाल्या की , शिवजयंती आणि संत गाडगे बाबांच्या जयंती निमित्ताने आयोजीत कार्यक्रमाला एक वेगळी उंची आहे , छत्रपतींचा आणि गाडगे बाबांचा आदर्श जीवनात जपा दिवंगत पहिलवान किसनराव डोंगरे बहुउदेशिय संस्थेचे सामाजिक हिताची कामे चांगली असून विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांना शोधुन त्यांचा मान सन्मान करणे , हे फार मोठे काम आहे .
टाकळी ढोकेश्वर येथील जागरण गोंधळ कार्यक्रमात कळशी नृत्य करणाऱ्या मनिषाताई चव्हाण यांचे कार्यक्रम आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहात असतो , मात्र आज त्यांना समक्ष पाहण्याचा योग आला . अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांनी संस्थेच्या कामकाजा बद्दल संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांचे खास अभिनंदन केले . पोलिस उपनिरिक्षक रतिलाल चौधर म्हणाले की , या संस्थेच्या वतीने वर्षे भरात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात , हे आदर्श उदाहरण आहे , त्यांचा आदर्श म्हणुनच या कार्यक्रमाला यावे लागले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यंदा पासून सुरू झालेला पहिला छबुबाई नगरकर लोककलावंत पुरस्कार मनिषाताई चव्हाण व लावणी सम्राज्ञी सारिका नगरकर यांना देण्यात आला . कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष पहिलवान नाना डोंगरे यांनी करून संस्थेच्या कामाचा लेखा जोखा सादर केला .संदिप रासकर यांनी सुत्रसंचालन केले , तर आभार संदिप डोंगरे यांनी मानले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here