पु.ना.गाडगीळ ॲण्ड सन्स यांच्या कलादालनात रमाकांत भालेराव यांच्या वारली चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

रमाकांत भालेराव

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । जिल्ह्यातील भुसावळ शहरातील चित्रकार रमाकांत भालेराव यांचे वारली चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव येथील पु.ना. गाडगीळ अँड सन्स येथील कला दालनामध्ये सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले .

या प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांचे हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी शंभू पाटील, भारत विकास परिषदेचे देवगिरी प्रांताचे संपर्क सचिव योगेश मांडे त्याचप्रमाणे कोठारी क्लासेसचे बिपिन शाह व पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक गिरीश डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, लोक चित्रकला आणि चित्रकला या कला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची कला वृद्धिंगत होण्यास मदत होईल .या कलेचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल यावेळी बोलताना शंभू पाटील यांनी  वारली चित्रकला शैली याबद्दल आपले वक्तव्य केले यात काळानुरूप वारली चित्रकलेची शैली कशी बदलत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. सर्व मान्यवरांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर चित्रकार रमाकांत भालेराव यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राजेश्री देशमुख यांनी केले. यावेळी भुसावळ येथील रंगकर्मी आणि चित्रकार अनिल कोष्टी, नृत्यशिक्षीका चारू भालेराव, संपदा भुरे,  सन्मुख चोरडिया आदि रसिक उपस्थित होते . हे प्रदर्शन दिनांक ३० मार्च पर्यंत बुधवार  वगळता सकाळी साडेदहा ते सायंकाळी आठ पर्यंत दररोज खुले राहणार आहे. तरी सर्व जळगाव मधील रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन चित्रकार रमाकांत भालेराव यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here