सोलापूर: घरकुल हप्त्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपाई एसीबीच्या जाळ्यात

लाच

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती १२ हजार रुपये स्वीकारताना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दि. १६ मार्च २०२६ रोजी करण्यात आली.

या प्रकरणी प्रशांत प्रकाश मुकुरे (वय ४५) – ग्रामपंचायत अधिकारी, उंबरगाव (रा. पंढरपूर), दत्तात्रय अभिमान कांबळे (वय ४५) – ग्रामपंचायत शिपाई, उंबरगाव या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील तक्रारदाराला ‘पंतप्रधान आवास योजने’तंर्गत घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा १,२०,००० रुपयांचा शेवटचा हप्ता मिळवून देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १२ हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने याप्रकरणी सोलापूर एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी १३ आणि १६ मार्च रोजी पडताळणी करण्यात आली. दरम्यान, आज सापळा रचला असता, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुकुरे यांच्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिपाई दत्तात्रय कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, शैलेश पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here