निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ पौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न; पत्रकार गणेश धनवडे यांना ‘स्वामी सेवा पुरस्कार’ प्रदान

श्री स्वामी समर्थ

इंदापूर (तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे) । इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची गावातून काढण्यात आलेली ग्रामप्रदक्षिणा. गावातील प्रत्येक चौकाचौकात महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. या दिंडीमध्ये महादेव भजनी मंडळाने सहभाग घेऊन आपल्या भजनाने वातावरण भक्तिमय करून सोडले होते.

पालखी मंदिरामध्ये परतल्यानंतर रात्री ८ ते ९ या वेळेत पंढरपूर येथील ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज यांचे स्वामी चरित्रया विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन झाले. त्यानंतर सामुदायिक नामजप आणि आरती करण्यात आली.

या सोहळ्याचे विशेष औचित्य साधून निमसाखर गावचे दिव्यांग पत्रकार कु. गणेश धनवडे यांना त्यांच्या कार्याबद्दल ह.भ.प. रेवणसिद्ध सलगर महाराज यांच्या हस्तेस्वामी सेवा पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात श्री आप्पासाहेब तुळशीराम बोंद्रे यांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. सौ. शितल सुनील सुतार यांनी आकर्षक रांगोळी काढली. रांगोळीसाठी लागणाऱ्या फुलांची सेवा श्री महादेव मारुती माळी यांनी केली. प्रवचन सेवेचे मानधन श्री राजाराम संभाजी जाधव यांच्याकडून देण्यात आले. या कार्यक्रमासाठी निमसाखर परिसरातील स्वामी भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात हा पौर्णिमा उत्सव पार पडला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here