गणपती विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे आवाहन

शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – तालुक्यातील जनतेने गणपती विसर्जन कुठल्याही नदीपात्रात किंवा घाटावर न करता नगरपालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी केले आहे. कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाला सहकार्य करत गणपती स्थापना केलेली नाही. बरीच गणेश मंडळे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असल्याकारणाने इतर मंडळांनी देखील त्यांना सहकार्य करता गणपती स्थापना न करण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांनी कौतुक केले आहे.तसेच घरगुती गणपती स्थापना केलेल्या सर्व नागरिकांनी विसर्जन करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याने नदीपात्र व घाटावर गर्दी न करता नगरपालिकेने दिलेल्या कृत्रिम तलावातच गणरायाचे विसर्जन करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
नगरपालिकेने शहादा शहरात ठिकाणी कृत्रिम तलाव निर्मिती केलेली आहे जसे गणेश नगर,गांधी नगर, प्रेस मारुती मैदान व बचपन स्कूलच्या समोर कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण संख्येत वाढ होत असून त्यासाठी सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणपती विसर्जना साठी प्रसिद्ध असलेला दक्षिण काशी प्रकाशा घाट येथे कोरोना संसर्ग वाढल्याने प्रकाशा ग्रामपंचायत यांच्याकडून बंद करण्यात आलेला आहे. तरी जनतेने वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मास्क,सॅनीटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here