सुसरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार (विजय निकम) – जिल्ह्यात होणाऱ्या सध्याचे पर्जन्यमान पाहता व नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेता शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्पातून आज संध्याकाळी 5 वाजता सुसरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे. नदीकाठावरील टेंभली, लोणखेडा,मलोणी, उंटावद, तिखोरा, शहादा, पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करझई, डामरखेड, लांबोरा या गावांतील नागरीकांनी दक्षता घ्यावी व नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. तलाठी, ग्रामसेवक,मंडळ अधिकारी यांनी मुख्यालय सोडु नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here